दारूची झिंग चढली अन् पेटला वाद, दोघांनी मित्रावर झाडल्या 3 गोळ्या, भरदुपारी 'त्या' शेतात नेमकं काय घडलं? 

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagr Crime : तीन मित्र दारू पीत असताना झालेल्या वादातून दोघांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. ही घटना गंगापूर...

Chhatrapati Sambhajinagar Crime Crime (AI Image)
Chhatrapati Sambhajinagar Crime Crime (AI Image)
Chhatrapati Sambhajinagar Crime : तीन मित्र दारू पीत असताना झालेल्या वादातून दोघांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. ही घटना गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी एका आरोपीला नेवासा फाटा येथे अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
राहुल नवथर (वय-31, रा. गळनिंब, ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल नवथर सोमवारी दुपारी त्याचे मित्र कानिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) यांच्यासोबत गट क्रमांक 306 मधील शेतात दारू पिण्यासाठी बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मावस आणि नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या.
advertisement
एक गोळी राहुलच्या डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यावर आणि तिसरी पोटात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह तिथेच सोडून दोन्ही आरोपी फरार झाले. त्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आरोपी योगेश नागे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्याला नेवासा फाटा येथे अटक केली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाईल बंद ठेवल्यामुळे त्याला शोधण्यात अडचणी येत आहेत.
advertisement
मृताचा भाऊ महेश नवथर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कानिफनाथ मावसने राहुलला गोळ्या घातल्या आणि योगेश नागेने त्याला मदत केली. या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला हे स्पष्ट झाले नसले, तरी वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
दारूची झिंग चढली अन् पेटला वाद, दोघांनी मित्रावर झाडल्या 3 गोळ्या, भरदुपारी 'त्या' शेतात नेमकं काय घडलं? 
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement