मृतदेहाची अवस्था पाहता, महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो बॅगेत भरून झुडपात फेकून दिला असावा, अशी दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात लांबपर्यंत दुर्गंधी पसरली होती. यामुळे परिसरातील एका शेतकऱ्याने दुर्गंधी नेमकी कशाची येतेय? याचा शोध घेतला. यावेळी ही भयानक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर चाकूर आणि वाढवणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
आठ महिन्यांतील दुसरी घटना
या घटनेमुळे चाकूर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी याच वाढवणा-चाकूर रोडवर हणमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या घटनेतील मृत महिला कोण होती, तिचा खून कोणी केला, याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. आणि आता पुन्हा याच मार्गावर दुसऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
खुनामागचे कारण काय? पोलिसांचा कसून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस, वाढवणा पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथक आणि मोबाईल व्हॅन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह कोणाचा आहे, या खुनामागचं नेमकं कारण काय आणि मारेकरी कोण आहे? याचा कसून तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.