लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील सुमठाना येथे घराच्या व शेतीच्या वाटणीवरून नातवाने तुकाराम दशरथ किवंडे या 95 वर्षीय वयोवृद्धाच्या डोक्यात जाड लाकडाने मारून खून केल्याची घटना समोर आली. शेतात असलेल्या घरात ही घटना घडली असून खून करून नातू बुद्धानंद राजेंद्र किवंडे हा पळून जात असताना उदगीरच्या बसस्थानकातून वाढवणा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलं. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहेत.
advertisement
वाचा - पुण्यात राख अंगावर पडल्याने तरुणावर सोडला पिटबूल कुत्रा; पुढे घडलं भयानक
शेती नावावर करुण्यावरुन वाद
उदगीर तालुक्यातील सुमठाना येथे मयत तुकाराम किवंडे यांची वडिलोपार्जित शेती आहे, या शेतीच्या वाटणीकरून माझ्या नावे शेती करण्याचा अट्टहास मयताचा नातू आरोपी बुद्धानंद किवंडे याने केली होती. त्यामुळे आजोबा आणि नातवात वाद झाले आणि त्याचाच राग मनात धरुन आरोपिने 95 वर्षीय आजोबाच्या डोक्यात जाड लाकुड घातले. तसेच छातीवर आणि पोटावर देखील लाकडाने मार दिला. त्यातच आजोबाचा जीव गेला. आरोपी विरुद्ध कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
