Pit bull Attack : पुण्यात राख अंगावर पडल्याने तरुणावर सोडला पिटबूल कुत्रा; पुढे घडलं भयानक
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pit bull Attack : पुण्यात क्षुल्लक कारणातून तरुणावर पिटबुल जातीचे कुत्र सोडल्याची घटना घडली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण आता जगभर प्रसिद्ध झाली आहे. या शहरात कधी काय होईल सांगता येत नाही. क्षुल्लक कारणावरुनही राडे झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. राख अंगावर पडल्याने तरुणावर चक्क पिटबूल कुत्रा सोडल्याचा प्रकार घडला आहे. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कुत्रा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
शेकोटी करीत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून त्याला चावा घेण्यास सांगितले. या कुत्र्याने संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना पर्वती येथील लक्ष्मी नगर मधील शाहू वसाहतीमध्ये घडली आहे.
advertisement
याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य नितीन आंदेकर (वय 25, सर्वे नंबर 92, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर, पर्वती), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तन्वीर रमजान सय्यद (वय 18, रा. लक्ष्मी नगर, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर सय्यद हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. पर्वती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर आणि त्यांचे मित्र घराजवळच शेकोटी करत बसलेले होते. त्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर राखेची टोपली ठेवण्यात आलेली होती. ही राखेची टोपली आरोपी आदित्य आंदेकरच्या अंगावर पडली. त्यामुळे चिडलेल्या आदित्य याने याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. ही टोपली तन्वीर यानेच टाकली असा समज त्याने करून घेतला. त्याने तन्वीरला शिवीगाळ करून गचांडी पकडत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे पिटबुल जातीचे कुत्रे सोबत होते. या कुत्र्याला ‘सारा धर याला’ असे म्हणत त्याच्या अंगावर सोडले. या कुत्र्याने फिर्यादीच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने ‘पोलीस चौकीमध्ये तक्रार देतोस काय?’ असे म्हणत बघून घेण्याची धमकी देऊन दमदाटी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
February 05, 2024 4:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pit bull Attack : पुण्यात राख अंगावर पडल्याने तरुणावर सोडला पिटबूल कुत्रा; पुढे घडलं भयानक


