खूप दारू प्यायला, म्हणाला माझ्यावर कर्ज आणि...., 18 वर्षांच्या तरुणाचं हादरवणारं कृत्य
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आधी हा तरुण मोठ्या प्रमाणात दारू प्यायला. यावेळी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला या 18 वर्षांच्या तरुणाने रेल्वेसमोरचा जीव देत आत्महत्या करत असल्याचे सांगत होता.
कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी
बस्ती : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून हत्या आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. तसेच तरुणाईमध्ये व्यसनाधीतेचही प्रमाण वाढलेले दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका तरुणाने रेल्वेखाली आपली जीव देत आत्महत्या केली. आधी हा तरुण मोठ्या प्रमाणात दारू प्यायला. यानंतर त्याने रेल्वेसमोर येत उडी घेत आपला जीव दिला. उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ही घटना घडली. मुंडेरवा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला या 18 वर्षांच्या तरुणाने रेल्वेसमोरचा जीव देत आत्महत्या करत असल्याचे सांगत होता. यानंतर शेवटी त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बस्तीच्या मुंडेरवा रेल्वे स्टेशनजवळ काल रात्री सांयकाळी उशिरा एक तरुणाचा विकृत छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. याबाबतची माहिती स्टेशन मास्टरने मुंडेरवा ठाण्यावर दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाला ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आणि मृताजवळ मिळालेल्या कागदपत्र आणि मोबाईलच्या माध्यमातून त्याची ओळख पटविण्यात आली.
तरुण तिलकराम चौधरी असे या तरुणाचे नाव आहे. तो 18 वर्षांचा होता. तसेच मुंडेरवा पोलीस ठाणे हद्दीतील मेहडापुरवा परिसरातील रहिवासी होता. ट्रेनसमोर उडी मारण्यापूर्वी त्याने मोबाईलने एक व्हिडिओ बनवला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
crime news : संपत्तीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, हादरवणारी घटना
view commentsव्हिडिओमध्ये तरुणाने हे सांगताना पाहिले गेले की, त्याने तीन बाटली दारू प्यायली आहे. तसेच मसालाही खाल्ला आहे. सोबत दारूच्या व्यसनामुळे या तरुणाने अनेकांपासून पैसे उधार घेतल्याचेही सांगितले. तसेच माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, असे सांगितले. याप्रकरणी बस्तीचे एएसपी ओम प्रकास सिंह यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कर्जातून त्याने आत्महत्या केली आहे, असे प्रथमदर्शनी व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. तरुणाला अंमली पदार्थांचे व्यसन होते. मात्र, सध्या काही सांगणे घाईचे आहे. तपासानंतरच पुढील माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.
Location :
Basti,Uttar Pradesh
First Published :
February 04, 2024 6:14 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
खूप दारू प्यायला, म्हणाला माझ्यावर कर्ज आणि...., 18 वर्षांच्या तरुणाचं हादरवणारं कृत्य


