crime news : संपत्तीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, हादरवणारी घटना

Last Updated:

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये दुकानांबाबत बराच काळ वाद सुरू होता, त्यामुळे आरोपी मगन सिंगने उमेद सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
राहुल मनोहर, प्रतिनिधी
सीकर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्या घटना घडत आहेत. यासोबत आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे नेमकी घटना -
दोन चुलत भावांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. संपत्तीतून जमिनीच्या वादातून दोन चुलत भावांमधील वाद विकोपाला गेला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत मोठ्या भावाच्या कुटुंबीयांनी लहान भावाच्या कुटुंबीयांना गंभीर जखमी केले. या घटनेत पती पत्नी आणि त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला. त्यांना त्यांना या गंभीर जखमी अवस्थेत जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात रेफर करण्यात आले होते.
advertisement
यादरम्यान, पतीचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. वाद झाल्याची ही घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील दांतारामगढ पोलीस ठाणे हद्दीतील आहे. उमेद सिंह (वय-55) असे मृताचे नाव आहे. ते दांतारामगढ येथील मोटलावास गावातील रहिवासी होते. तर मगन सिंग असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
advertisement
पती मजूर, पत्नीने एकटीने सुरू केली ही शेती, आज घरी बसून करतेय लाखोंची कमाई
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये दुकानांबाबत बराच काळ वाद सुरू होता, त्यामुळे आरोपी मगन सिंगने उमेद सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात उमेद सिंग यांचा मृत्यू झाला. आरोपी मगनसिंग हा आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात राहत आहे. तो मुलाच्या लग्नासाठी गावी आला होता. यावेळी दुकानाबाबत दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर या धक्कादायक घटनेत झाले.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
crime news : संपत्तीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, हादरवणारी घटना
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement