पती मजूर, पत्नीने एकटीने सुरू केली ही शेती, आज घरी बसून करतेय लाखोंची कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सुमन देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती लखनऊ शहरातील एका खासगी कंपनीत मजूर म्हणून काम करायचे.
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
रायबरेली : आजच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. यातच आज आपण एका अशा महिलेची कथा जाणून घेणार आहेत, ज्या महिलेचा पती हा मोलमजरी करायचा. त्यामुळे घरची परिस्थिती साधारण असताना या महिलेने स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ही महिला आज घरी बसून लाखो रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
सुमन देवी असे या महिलेचे नाव आहे. सुमन देवी या उत्तरप्रदेशातील रायबरेली येथील रीवा गावातील रहिवासी आहेत. आपल्या कौशल्याच्या बळावर, हिंमतीच्या बळावर त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली. सुमन देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती लखनऊ शहरातील एका खासगी कंपनीत मजूर म्हणून काम करायचे. घरातील सर्व कामे संपवल्यावर त्यांना मोकळा वेळ मिळायचा.
advertisement
यादरम्यान, आपण आपल्या शेतात काहीतरी करायला हवे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे पारंपारिक शेती न करता त्यांनी आपल्या अंदाजे दीड एकर जमिनीवर बागायती सुरू केली. त्यामुळे आज त्या कमी खर्चात घरी बसून जास्त नफा कमवत आहे.
सुमन देवी यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये फुलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटो, मिरचीची लागवड केली आहे. त्यांच्या या भाजीपाल्याच्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. आता त्या स्वत: ही शेती करत आहेत, यामुळे त्यांच्या शेतीचा खर्चही कमी होत आहे.
advertisement
महिला शेतकरी सुमन देवी यांनी सांगितले की, त्यांच्या या शेतीमध्ये त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा जास्त फायदा होत आहे. एका एकरासाठी सुमारे 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत एका हंगामात दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या दरवर्षी त्यांच्या शेतात हंगामी भाजीपाल्याची शेती करतात. यामध्ये त्या प्रामुख्याने वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, आणि कोथिंबीर तसेच पालक, बटाटे इत्यादी भाजीपाला घेतात.
advertisement
सुमन देवी यांचा सल्ला -
view commentsसुमन देवी सांगतात की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, त्यामुळेच आपण आपले काम करताना लाजू नये. माझे पती लखनऊमध्ये मजूर म्हणून काम करायचे. आता ते ही मला शेती करताना मदत करतात. आम्ही दोन्ही पती-पत्नी घरी बसून चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Uttar Pradesh
First Published :
February 04, 2024 2:41 PM IST


