Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेससाठी रेल्वे बोर्डाकडून पावणेपाच कोटींचा निधी; पुण्यात इथे होणार डेपोचा विस्तार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मध्य रेल्वे विभागात पुणे, मुंबई (वाडीबंदर) आणि नागपूर (अजनी) येथे 'वंदे भारत कोचिंग डेपो' वाढविण्यात येणार आहेत.
पुणे : वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची क्षमता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यानुसार, मध्य रेल्वे विभागात पुणे, मुंबई (वाडीबंदर) आणि नागपूर (अजनी) येथे 'वंदे भारत कोचिंग डेपो' वाढविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी रेल्वे बोर्डाने सुमारे पावणेपाच कोटी (४.७५ कोटी) रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मध्य रेल्वे विभागांतर्गत पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अशा अनेक विभागांमध्ये वंदे भारत गाड्या धावत आहेत. वाढत्या संख्येमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या देखभाल डेपोंवर मोठा ताण येत आहे. भविष्यात आणखी काही वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता असल्याने, त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर आणि जलद गतीने होण्यासाठी हे डेपो आवश्यक आहेत.
advertisement
या योजनेअंतर्गत, पुण्यातील घोरपडी कोचिंग आणि मेंटेनन्स डेपोचे आता वंदे भारत कोचिंग डेपोमध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच, मुंबईतील वाडीबंदर आणि नागपूरमधील अजनी कोचिंग डेपोचे देखील रूपांतर वंदे भारत एक्सप्रेस कोचिंग डेपोमध्ये केले जाईल. एकट्या घोरपडी डेपोसाठी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या डेपोमध्ये वंदे भारतच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक स्वतंत्र लाइन, तसेच 'अमृत भारत एक्स्प्रेस' आणि एलएचबी (LHB) कोचसाठी स्वतंत्र लाइन टाकली जाणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांच्या मेंटेनन्स प्रणालीला मोठी गती मिळणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 7:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेससाठी रेल्वे बोर्डाकडून पावणेपाच कोटींचा निधी; पुण्यात इथे होणार डेपोचा विस्तार


