लातूर शहरातल्या पूर्व भागात राहणाऱ्या कुख्यात दरोडेखोर डॉन मुकड्या उर्फ सुजातअली सय्यद याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी ताजोद्दीन बाबा दर्ग्यात घडली होती. मयत डॉन मुकड्यावर 17 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होते. पूर्व भागात मुकड्याची दहशत होती. त्यामुळे लोक देखील मुकड्याला घाबरुन तो मागेल तेवढे पैसे द्यायचे. याचाच फायदा घेऊन मुकड्या कोणालाही त्रास द्यायचा. याच भागातील रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार सलीम उर्फ जालीम शेख याने मुकड्याचा काटा काढायचा प्लान केला. मुकड्या रात्री नशेत ताजोद्दीन बाबा दर्ग्यात झोपल्याचे पाहुन त्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर जालीम शेख नांदेडमार्गे हैदराबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी समीर उर्फ जालीम शेख याला हैदराबाद येथून अटक करत बहुचर्चित मुकड्या डॉन खून प्रकारणाचा छडा लावला आहे.
advertisement
वाचा - खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरले; मध्यरात्री दोन वेगळ्या ठिकाणी दोघांना संपवलं
आठवड्यापूर्वी घडली होती घटना
लातूर शहरातील विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्तालगत असलेल्या ताजोद्दीन बाबा दर्ग्यात एका कथित गुन्हेगारी प्रवृत्ति असलेल्या डॉनचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर परिसरातील एकाने 112 वरुन पोलिसांना सदर घटना सांगितली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सोबतच तपास पथकातील श्वानांची देखील या तपासात मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक लॅबची टिमसुद्धा घटनास्थळावर उपस्थित होती. खुन झालेल्याचे नाव सय्यद फारुक सुजातअली उर्फ मुकड्या (वय 37 वर्षे) असुन तो ताजोद्दीन बाबा मंदिर परिसरात रहायला होता. त्याच्यावर पोलिसात विविध गुन्हे नोंद असल्याचे समजते.
