Pune Crime : खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरले; मध्यरात्री दोन वेगळ्या ठिकाणी दोघांना संपवलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune Crime : काही दिवसांपूर्वीच गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : कधीकाळी शांततापूर्ण असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षात गुन्हेगारांनी ग्रासले आहे. कोयता गँगने तर शहरात उच्छाद मांडला होता. काही दिवसांपूर्वीच गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच खुनाच्या घटनांनी पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून झाले.
मध्यरात्री दोन वेगळ्या ठिकाणी दोन खून
आज सकाळच्या सुमारास या घटना उघडकीस आल्या आहे. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री अरबाज शेख नामक तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अरबाज शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली होती. यातून त्याची काही दिवसांपूर्वी सुटका झाली होती. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री त्याच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झालाय.
advertisement
दुसरी घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाजी मंडई परिसरात घडली. रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ज्याचा खून झाला तो गवंडी काम करत होता. घरात न झोपता तो बाहेरचं झोपायचा. शुक्रवारी रात्री देखील कात्रज परिसरातील मंडई जवळ असणाऱ्या रस्त्यालगत झोपला होता. त्यावेळी गाढ झोपेत असताना एका व्यक्तीने त्याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.
advertisement
शरद मोहोळ प्रकरणात आणखी तीन जणांना अटक
view commentsगुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात 2 वकिलांचाही समावेश आहे. दरम्यान आता या हत्याप्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री या आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता तेरावर पोहोचली आहे. आरोपींनी मोहळ याला संपवण्याचा कट एक महिन्यांपूर्वीच रचला होता. या प्रकरणात सर्व पैशांची मदत ही नितीन खैरे यानं केली होती. तर आदित्य गोळे यानं हत्येसाठी लागणारे पिस्तुल खरेदी करण्यासाठी पैसे पुरवल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 13, 2024 5:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरले; मध्यरात्री दोन वेगळ्या ठिकाणी दोघांना संपवलं


