अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर एकजण अडकला होता. या एका व्यक्तीची प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली. शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Weather Alert: 24 तास पावसाचे, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
advertisement
शिरूर अनंतपाळ जवळील घरणी नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्यात अडकलेल्या तीन मजुरांना स्थानिक पथकाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना पाण्यात वाहत गेलेल्या दौलत गोपाळ डोंगरगावे यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले.
सैन्याला पाचारण
लातूरमधील काही तालुक्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक अहमदपूर येथे दाखल होणार आहे.
जिल्ह्यातील 49 रस्ते बंद
लातूरमधील धरणे पूर्णपणे भरली असून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 49 रस्ते हे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.