राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये लावणी सादर करणाऱ्या महिलेचं नाव शिल्पा शाहीर असं आहे. शिल्पा शाहीर या अनेक लावणीचे ईव्हेंट करत असल्याची माहिती समोर आली. आपल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिल्पा यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून स्पष्टीकरण दिलंय.
'नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दिवाळी मिलन कार्यक्रम असल्याने मी या कार्यक्रमाला हजर होते. तिथे वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीचे कला सादर करत होते. मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडलेली आहे. आणि सध्या माझी चहापानाला पाहुणं बोलवा ना, रायबा इमानदार चित्रपटातील लावणी चर्चेत आहे. माझी मैत्रीण रेखाताई झरडे आणि सुनिता येरणे यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी लावणी सादर केली' असं स्पष्टीकरण शिल्पा शाहीर यांनी केलं.
advertisement
तसंच, 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्या महिलांना गाणं म्हणता येत होतं, त्यांनी गाणं म्हटलं. काही पुरुष कार्यकर्त्यांनी तिथे डान्स केला होता. आता मी लावणी कलाकार असल्यामुळे मी लावणी केली. मी लावणीचे इव्हेंट करते. सगळीकडे लावणीच्या चर्चा होती म्हणून मी कार्यालयात लावणी केली. या कार्यक्रमाला सगळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील लोक उपस्थित होते. यामध्ये काही चुकीचा प्रकार घडला नाही, असा खुलासा लावणी सादर करणाऱ्या शिल्पा शाहीर या महिला कार्यकर्तीने केला.
