TRENDING:

मदत करायचीये, UPI नंबर द्या, मित्राचा नंबर सांगताच शिव्यांना सुरुवात, ऑडिओ क्लिपमुळे लक्ष्मण हाके अडचणीत

Last Updated:

Laxman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शरद जाधव, प्रतिनिधी, मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय...या क्लिपमध्ये एक तरुण लक्ष्मण हाकेंना मदत म्हणून पैशांची ऑफर देताना ऐकू येतो, लक्ष्मण हाकेंनी ही ऑफर स्वीकारताच तरुण त्यांच्यावर टीका करताना ऐकू येतोय. दुसरीकडे हे बदनामीचं षडयंत्र असल्याचा दावा हाकेंनी केलाय.
लक्ष्मण हाके ऑडिओ क्लिप
लक्ष्मण हाके ऑडिओ क्लिप
advertisement

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. पण, याच ऑडिओ क्लिपमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या कथित ऑडिओ क्लिपमधून हाके यूपीआयद्वारे लाखो रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. या ऑडिओ क्लिपवरून लक्ष्मण हाके यांच्यावर टीका सुरू झालीय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यानी या क्लिपनंतर हाकेंवर हल्ला चढवत चौकशीची मागणी केलीये.

advertisement

माझ्या विरोधातील बदनामीच्या षडयंत्राने मी थांबणार नाही

ऑडिओ क्लिपवरुन लक्ष्य केलं जात असतानाच लक्ष्मण हाकेही समोर आले. व्हायरल क्लिपवर मौन सोडत हाकेंनी स्पष्टीकरण दिलं. हा आपल्याविरोधातील डाव असल्याचं म्हणत हाकेंनी आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रात ओबीसींची चलवळ जोमाने उभी राहिल, माझ्या विरोधातील बदनामीच्या षडयंत्राने मी थांबणार नाही, मी घाबरत नाही. ओबीसींचा लढा मी जोमाने लढेन, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

advertisement

ओबीसी नेत्यांकडून हाकेंची पाठराखणजरांगेंसह मराठा बांधवांकडून हाकेंवर टीका केली जात असतानाच ओबीसी नेत्यांनी मात्र हाकेंची पाठराखण केल्याचं दिसलं. हाकेंचा उद्देश चुकीचा नव्हता, तर हा हाकेंना बदनाम करण्याचा कट असल्याचं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. कोणतीही आंदोलने, मोर्चे हे पैशांशिवाय होत नाहीत. मोर्चा आंदोलनाला पैसे लागतातच, असे म्हणत वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची बाजू घेतली.

advertisement

हाकेंना ऑफर की अडकविण्याचा प्रयत्न?

ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण देताना हाके स्वतः निर्दोष असल्याचा दावा करतायेत. पण ज्या पद्धतीनं हाकेंना ऑफर देण्यात आली, त्यावरुन ही मदतीची ऑफर होती की अडकविण्याचा प्रयत्न? हा सवाल आहे. ज्याचं उत्तर चौकशीनंतर समोर येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मदत करायचीये, UPI नंबर द्या, मित्राचा नंबर सांगताच शिव्यांना सुरुवात, ऑडिओ क्लिपमुळे लक्ष्मण हाके अडचणीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल