TRENDING:

Sangali: पलंगाखाली कुत्रा समजून हुसकावलं, पण आवाज वेगळाच, अश्विनीने लगेच दार केलं बंद; सांगलीतील थरारक घटना

Last Updated:

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या वाळवण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेलं दिसलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिराळा : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी-कोकरूडमध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. घरात बिबट्या शिरल्याचं घाबरून न जाता त्या महिलेनं मोठ्या हिंमतीने पाऊल उचललं. बिबट्या घरात असताना महिलेनं बाहेरून कडी लावली आणि आपला जीव वाचवला. अखेरीस वन विभागाचं प्राचारण झालं आणि बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना  शिराळा तालुक्यातील माळेवाडी-कोकरूडमध्ये माळेवाडी या गावात घडली. अश्विनी अरुण गोसावी असं या धाडसी महिलेचं नाव आहे.   गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारस शिरला होता.  घरात शिरल्यानंतर बिबट्या कॉटच्या खाली जाऊन लपून बसला होता. गोसावी कुटुंबातील अश्विनी गोसावी यांना गुरगुरण्याचा आवाज आला, त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचा समजून हुसकवण्याचा प्रयत्न केला, तसा आवाज आणखी वाढला, काही क्षणात त्यांना हा बिबट्या असल्याची बाब लक्षात आली. मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराला कडी लावली.

advertisement

त्यानंतर अश्विनी यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली यानंतर काही वेळात वन विभाग आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच प्रयत्नानंतर शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

advertisement

बिबट्या घरात घुसला कसा?

माळेवाडी येथील असलेल्या गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचे दुमजली घर असून, खाली ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. तर वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीचे सामान आणि इतर साहित्य,कपडे सुकवण्यासाठी वापरतात. या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असल्याने रविवारी शेजारी असलेल्या शौचालयाचा सहारा घेत रात्रीच्या वेळी बिबट्याने दरवाजा मधून आत मध्ये घुसून खोलीत असलेल्या कॉटखाली बसला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या वाळवण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेलं दिसलं. आधी हा कुत्रा आहे असं वाटलं पण बिबट्याने आवाज वाढवला तेव्हा बिबट्या आहे हे लक्षात आलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangali: पलंगाखाली कुत्रा समजून हुसकावलं, पण आवाज वेगळाच, अश्विनीने लगेच दार केलं बंद; सांगलीतील थरारक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल