त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुद्द्यावर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेवर सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांचा विजय झाला आहे. तर कैलास घुले हे 1200 मतांनी पराभव झाला आहे. ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर शिंदे सेनेचा हा मोठा विजय मानला जात आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठीही हा मोठा पराभव मानला जात आहे.
advertisement
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण?
भाजपकडून कैलास घुले, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरेश गंगापुत्रे, शिवसेना शिंदे गटाकडून त्रिवेणी तुंगार, शिवसेना शिंदे गट तर महाविकास आघाडीकडून दिलीप पवार यांना संधी देण्यात आली होती.
एकनाथ शिंदे यांची जादू चालली
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगरविकास रचनेचा मंत्री म्हणून आपण त्र्यंबकेश्वर येथे कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जुनी घरे नियमीत करू, जुने वाडे वारसास्थळ आहेत. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांचा विकास करणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दिले. साधू-संतांसाठी जागा आवश्यक आहे. त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. त्र्यंबकेश्वर शहर संपूर्ण भारताचे वैभव असून या ठिकाणी गंगा गोदावरीचा जन्म झाला. येथे येणाऱ्या संत, महंत, भाविकांकडून टोल घेणार का ? आम्ही इथला टोल काढून टाकला. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. शुरांची, वीरांची भूमी आहे. संतांच्या या भूमीत सर्व संत मंडळी व्यासपीठावर आहेत, वारकरी मंडळी आहेत. आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. असेही ते म्हणाले होते.
