TRENDING:

Loksabha Election Results 2024 : एकनाथ शिंदेंना होम ग्राऊंडवर धक्का, ठाण्यात ठाकरे गटाची आघाडी

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलटची मतं मोजली जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या होम ग्राऊंडवरच धक्का लागत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलटची मतं मोजली जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या होम ग्राऊंडवरच धक्का लागत आहे. पहिल्या कलामध्ये ठाण्याच्या जागेवर शिवसेना ठाकरे पक्षाचे राजन विचारे आघाडीवर आहेत, तर नरेश म्हस्के पिछाडीवर आहेत. महाराष्ट्रातल्या 48 पैकी 23 जागांचे कल हाती आले आहेत. यात भाजप 13, शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे तर ठाकरेंची शिवसेना 6 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत खातं उघडलेलं नाही.
एकनाथ शिंदेंना होम ग्राऊंडवर धक्का, ठाण्यात ठाकरे गटाची आघाडी
एकनाथ शिंदेंना होम ग्राऊंडवर धक्का, ठाण्यात ठाकरे गटाची आघाडी
advertisement

जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. पण एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 ते 380 पर्यंत जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहण्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी मोदींचा रथ रोखणार का, लोक इंडिया आघाडीला स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

महाराष्ट्रात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर. राज्यात महायुती की मविआ कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीनं आपण राज्यात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय. तर मविआ नेतेही आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करत आहेत. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. बारामती, माढा, शिरूर, बीड, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सांगली या मतदारसंघामध्ये कांटे की टक्कर झाली. अनेक मतदारसंघामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला याचा अंदाज छातीठोकपणे कुणालाही वर्तवता येत नाही. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर या मतदानात दिसणार का याची चर्चा आहे. तर राज्यात वंचितचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकताही आहे.

advertisement

एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

‘न्यूज18 लोकमत’च्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला. सर्वात मोठा आणि विश्वसनीय ‘मेगा एक्झिट पोल’नुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 32-35 जागांचा अंदाज असून मविआला 15-18 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला 20-22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11-13 जागांचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेचा अंदाज आहे. तर उबाठा पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Election Results 2024 : एकनाथ शिंदेंना होम ग्राऊंडवर धक्का, ठाण्यात ठाकरे गटाची आघाडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल