रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून कोकणात महायुतीत धुमशान सुरू झालंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत शिवसेनेच्या तिकीटावर लढणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. किरण सामंत यांनीही किरण सामंताला रोखणार कोण? असा थेट इशारा स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना दिला. वर्षानुवर्ष युतीत या मतदारसंघातून शिवसेनेनं विजय मिळवला, मात्र आता रवींद्र चव्हाणांच्या रूपानं तगडा उमेदवार उतरवून भाजपचा झेंडा रोवण्याची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात दाणादाण उडाली आहे. मात्र जागा सोडणार नसल्याचंही शिवसेनेनं निक्षून सांगितलं.
advertisement
सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार
शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी टेन्शन हलकं करण्याचा प्रयत्न केला. जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. महायुतीत वाद सुरू झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं तत्परतेनं त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. महायुतीत असंच होणार हे आधीच सांगितलं होतं, याची आठवण अरविंद सावंतांनी करून दिली.
मुहायुतीतील शिवसेनेनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजपनंही या मुद्यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
'जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला', घोषणा कधी? सुप्रिया सुळेंनी मुहूर्त सांगितला