Loksabha Elections 2024 : 'जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला', घोषणा कधी? सुप्रिया सुळेंनी मुहूर्त सांगितला
- Published by:Shreyas
Last Updated:
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
मुंबई : देशभरातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अनेक पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी आगामी काळात महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तर आठ दिवसांत फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
'प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीत येण्याचा विचार नक्की करतील,' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
advertisement
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 'प्रकाश आंबेडकर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला समन्वय आहे, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे, आंबेडकर आणि शरद पवार यांचाही संवाद आहे, महाविकासआघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढचा विषय आहे', असं संजय राऊत म्हणाले.
advertisement
'महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची, शरद पवारांची उद्धव ठाकरे यांची, राहुल गांधी यांची भूमिका आहे, त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे', असं संजय राऊत यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : 'जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला', घोषणा कधी? सुप्रिया सुळेंनी मुहूर्त सांगितला