TRENDING:

BJP : ''दुसऱ्याचं घर फोडून आपलं घर...'', चंद्रशेखर बावनकुळेंना महादेव जानकरांनी सुनावलं

Last Updated:

Mahadev Jankar On Chandrashekhar Bawankule : बैठकीतील अंदर की बात बाहेर आल्यानंतर काँग्रेसने बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीदेखील बावनकुळे यांना सुनावले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष रिकामा करून भाजपाची ताकद वाढवण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिला. बैठकीतील अंदर की बात बाहेर आल्यानंतर काँग्रेसने बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीदेखील बावनकुळे यांना सुनावले आहे. दुसऱ्याचं घर फोडून आपल घर जास्त दिवस चालत नसल्याचे जानकर यांनी म्हटले.
News18
News18
advertisement

दिल्लीत बोलताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये साजरी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या जयंती कार्यक्रमाला स्टॅलिन, अखिलेश यादव, राहुल गांधी, शरद पवार यांना बोलावण्याचा आमचा प्रयत्न आहे पण अद्याप त्यांनी होकार कळवला नसल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यानगरमधील चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्याबाबत बोलताना महादेव जानकर यांनी म्हटले की, राज्य सरकारच मी अभिनंदन करतो की ते अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चोंडीमधे कॅबिनेट बैठक घेत आहेत. त्या समाजाला आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे. धनगरांच्या आरक्षणाचा ठराव या बैठकीत मांडला तर आमचा पक्ष त्यांचं अभिनंदन करेल असेही त्यांनी म्हटले.

advertisement

बावनकुळेंना सुनावलं....

या दरम्यानच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर टीका केली. जानकर यांनी म्हटले की, माझ्याही पक्षाचा एक आमदार भाजपने फोडलाच ना असा सवाल त्यांनी केला. दुसऱ्याचं घर फोडून आपल घर जास्त दिवस चालत नाही, आपलंच घर पहिलं मजबुत करावं लागतं असा टोलाही जानकर यांनी लगावला.

जातनिहाय जनगणनेचं स्वागत...

महादेव जानकर यांनी जातनिहाय जनगणना होणार असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. जानकर यांनी म्हटले की, आम्ही 30 वर्षांपासून ही मागणी करत होतो पण त्याला यश येत नव्हते. जातनिहाय जनगणना केल्याने जातीवाद आजिबात वाढत नाही हे मी ठामपणे सांगत होतो. जात निहाय जनगणना करत असताना त्या त्या समाजाला त्यांची भागीदारी मिळायला हवी अशी भूमिकादेखील जानकर यांनी व्यक्त केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : ''दुसऱ्याचं घर फोडून आपलं घर...'', चंद्रशेखर बावनकुळेंना महादेव जानकरांनी सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल