बीडच्या गेवराई शहरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांच्या प्रचार सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. पाडल्याशिवाय दुसरा येणार नाही म्हणून पाडापाडीचे भाषा बोलत आहोत,असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघांमध्ये ओबीसीचा अंडर करंट काय असतो हे एका 23 तारखेला महाराष्ट्रात दिसेल. 25 पेक्षा जास्त आमदार आणि 23 तारखेला क्रांतिकारी निकाल यावेळेस येईल भलीभली माणसं घरी बसलेले असतील,असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
advertisement
जरांगे नावाच्या माणसाला 287 मतदारसंघ दिसत नाहीत. शरद पवारांच्या सांगण्यावरून तो येवल्याला गेला. त्यामुळे त्यांना छगन भुजबळ यांच्या नावाचा कावीळ झाला आहे, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
येवल्यात जरांगे काय म्हणाले?
नाशिकमध्ये मनोज जरांगे म्हणाले, लोकसभेला जे सांगितले तेच विधानसभेला ही सांगितले ज्याला निवडायचं त्याला निवडा ज्याला पाडायच त्याला पाडा. राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. एका समाजावर राजकरण करणे शक्य नाही स्वतःची लेकरं अधिकारी झाली मला हा टक्का वाढवायचा आहे, त्यासाठी हा लढा आहे. त्यामुळे कोणी पैसे घेऊ नका आणि दिलेत तर घ्या त्याच्या एकट्या बापाचे नाही.
शेतीमालाला योग्य भाव हवा त्याशिवाय मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये. राज्यात आता कुठेच उपोषण करायच नाही फक्त तारीख सांगेल त्यावेळी अंतरवली सराटीला या. सरकार कोणाचे पण येऊ दे, सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवतो. मराठे कुणाचंही सरकार पाडू शकतात असे जरांगे म्हणताच सभेत घोषणाबाजी झाली. त्यानंतर आता तुम्ही ठरवलंय आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडणार हे नक्की दिसतय, असे जरांगे म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय त्यात येवला येथे आलो त्यात काही विशेष नाही, गाव आहे त्यांना टाळू शकत नाही. लोकसभेला देखील सांगितले होते पाडा तर पाडा. येवला महाराष्ट्राच्या बाहेर नाही, एकदा लोकांनी ठरवले तर ठरवले आहे परिवर्तन होणार असे देखील जरांगे म्हणाले.
