TRENDING:

हल्ला स्टंट होता का? अनिल देशमुखांच्या मुलाने भाजप आमदाराला सुनावलं

Last Updated:

मी आत्ताच काटोल वरून आलोय. माझे वडील गोळी घेऊन बेडवर झोपून आहेत. त्यांच्या कपाळाला आणि मानेला दुखापत झाली आहे, सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर सगळं समोर येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तसेच या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शरद पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यात आता अनिल देशमुख यांचा मुलगा आणि काटोल मतदार संघाचा राष्ट्रवादीचा (शरद पवार) सलील देशमुख या प्रकरणावरून आक्रमक झाले असून त्यांनी भाजप आमदाराला सुनावलं आहे.
सलील देशमुखांचा मोठा आरोप
सलील देशमुखांचा मोठा आरोप
advertisement

अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा सहानुभूतीसाठी स्टंट असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपावर बोलताना सलील देशमुख म्हणाले की,मी आत्ताच काटोल वरून आलोय. माझे वडील गोळी घेऊन बेडवर झोपून आहेत. त्यांच्या कपाळाला आणि मानेला दुखापत झाली आहे, सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर सगळं समोर येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना सलील म्हणाले की, सहा वाजता प्रचार सभा संपल्यावर ते जलालखेडा येथून येत होते.त्यांच्यासोबत गाडीत उज्वल भोयर आणि डॉ. गौरव चतुर्वेदी सोबत होते.. सुरक्षा रक्षकांची गाडी मागे काही अंतरावर होती त्यादरम्यान हा भ्याड हल्ला झाला. हा हल्ला झाल्यावर काटोल नरखेडच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्हा या घटनेचा विचार करू लागला आहे. तसेच तुमच्या जिल्ह्यात हल्ले का होत आहे. अमित शहा यांचे दौरे का रद्द होत आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहे असा थेट आरोप सलील देशमुख यांनी केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

तसेच भाजप नेते परिणय फुके यांनी अनिल देशमुख यांनी स्वत:च स्वत:वर हल्ला घडवून आणला होता, त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची आरोप त्यांनी केला होता. या आरोपावर सलील देशमुख म्हणाले, परिणय फुके सारख्या दीड दमडी आमदारांलां देवेंद्र फडणवीस यांचा तळवे चाटू असा म्हणून ओळखला जातो.मी त्याला उत्तर देण्यास बाधील नाही. तसेच काटोल मतदार संघातील भाजप उमेदवार चरण सिंह ठाकुर याला देवेंद्र फडणवीस यांचा वरदस्त असल्याने हे सगळे घडत आहे. काही दिवसापूर्वी चरण सिंह ठाकुर यांच्या व्यक्तीने एका व्यक्तीचा खून केला, एका मुलीवर अत्याचार झाला, अशा अत्याचार करणाऱ्याला या चरण सिंह ठाकुर यांनी आपल्या घरात शरण दिली होती हे जगजाहीर आहे. तसेच एखाद्या नेत्यावर असा हल्ला झाल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना असतात मात्र आम्ही सगळ्यांना शांततेचा आवाहन केलं आहे, असे सलील देशमुख यांनी सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हल्ला स्टंट होता का? अनिल देशमुखांच्या मुलाने भाजप आमदाराला सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल