ॲक्सिक माय इंडियाच्या एक्झिट पोलनूसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी सर्वांधिक पसंती ही एकनाथ शिंदे यांच्या नावासाठी आहे. महाराष्ट्रातील 31 टक्के लोकांची मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती आहे. शिदेंनंतर पसंतीच्या दुसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे आहेत. 18 टक्के लोकांचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, असा कौल आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीआधी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही अशी भूमिका स्पष्ट करणाऱ्या देवेंद्र फडवीसांना 12 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे 12 टक्के लोकांना वाटते की फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावे,असे पोलमधून समजते.तसेच काँग्रेसमधून देखील एखादा नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी 10 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
advertisement
विधानसभेच्या मतदानानंतर अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. मात्र असे असले तरी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाराष्ट्रातील फक्त 2 टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.
दरम्यान आता 23 नोव्हेंबरनंतर येणाऱ्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे कळणार आहे.
