ॲक्सिक माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना युबीटी गट 26 ते 32 जागा जिंकण्याचा अंदाज आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 53-58 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ॲक्सिक माय इंडियाच्या पोलनुसार शिंदेंच्या नेतृत्वाची ताकद वाढताना दिसते.
शिवसेनेते बंडखोरी झाल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडी जिंकली होती. यामध्ये सर्वांधिक जागा जिंकण्यात ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.ठाकरेंनी 9 जागा जिंकल्या होत्या.तर शिंदेंच शिवसेना 7 जागा जिंकून पाचव्या क्रमांकावर होती. त्यामुळे शिंदेंना आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची विधानसभा निवडणुकीत संधी होती. त्यानुसार विधानसभेत एक्झिट पोलनुसार शिंदे आपलं नेतृत्व सिद्ध करताना दिसतायत.
advertisement
तसेच ॲक्सिक माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुती बहुमताचा आकडा गाठताना दिसतेय. महायुतीला 178-200 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 82-102 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
