प्रहारचे उमेदवार सय्यद अबरार यांनी दिला अचानक काँग्रेसचे उमेदवार (महाविकास आघाडी) सुनील देशमुख यांना पाठिंबा अचानक पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. उमेदवाराने पाठिंबा दिल्याने सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे. अबरार यांच्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्यांक मताची विभागणी होणार नाही आणि ती मते सेक्युलर पार्टीकडे वळतील असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
सय्यद अबरार यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही : सुनील देशमुख
सुनील देशमुख म्हणाले, सय्यद अबरार यांनी स्वखुशीने आम्हाला पाठींबा दिले. काल ते मला भेटले आणि म्हणाले माझ्या लक्षात आले की मी निवडणुकीत उभे राहणे हे फोल आहे. काही मते मी घेईल पण त्यामुळे सेकियुलर पार्टीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यामध्ये सर्वांचे एकमत झाले की, विनाकारण उभे राहण्यात काही तथ्य नाही. त्यामुळे तुम्ही महाविकासआघआडीच्या उमेदवाराला पाठींबा द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही किंवा आमीष दिले नाही.
अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी करण्याचा विरोधकांचा डाव : सुनील देशमुख
भाजप आणि महायुतीच्या काही लोकांना अल्पसंख्यांकांमध्ये विभागणी झाली पाहिजे असे वाटते. या मतामध्ये विभागणी झाली तर आपला उमेदवार निवडून येतो असे त्यांना वाटते. सय्यद अबरार यांच्या पाठींब्याचा आम्हाला फायदा होईल आणि मते सेक्युलर पार्टी म्हणून आमच्याकडे वळतील, असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
