मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडूच्या प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी सध्या प्रचार सभेच व्यस्त आहेत. अशात शुक्रवारी रात्री चौधरी यांची चारचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली आहे. चौधरी यांच्या घराबाहेर सफेद रंगाची चारचाकी उभी होती. ही चारचाकी एका अज्ञात इसमाने पेटवल्याची घटना घडली आहे. नेमकी ही कार कशी पेटवली याची माहिती समोर आली नाही आहे. मात्र या घटनेत आगीचा कोळसा झाला आहे.दरम्यान या हल्ल्याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल झाली असून अज्ञात इसमाचा शोध सुरु आहे
advertisement
यवतमाळ विधानसभा मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस भाजपमध्ये थेट लढत होणा आहे. काँग्रेसकडून अनिल मांगुलकर आणि भाजपकडून मदन येरावर रिंगणात आहेत.तर प्रहारकडून बिपीन चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे धरम ठाकूर आणि बहुजन समाज पक्षाचे भाई अमन नरसिंगानी रिंगणात आहेत.या पाच उमेदवारामधून कोण बाजी मारतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
