छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला नाही. आतापर्यंत दोन तास उलटले आहे आणि एकही ग्रामस्थ मतदानासाठी आला नाही आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट आहे. दरम्यान गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
advertisement
दरम्यान आज राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडते आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा येत्या 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 20, 2024 9:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील 'या' बुथवर दोन तासात एकही मतदान नाही, कारण...
