पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून पाठिंब्यासाठी फोनवरून संपर्क करण्यात आला आहे, असे हितेंद्र ठाकुरांनी सांगितले आहे. तसेच माझे सगळ्याच पक्षाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मी कोणाला ही वर्ज नाही, त्यामुळे उद्या काय निकाल येतो ते पाहूया आणि निर्णय घेऊया, असे ठाकूर म्हणालेत.
advertisement
आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावाच लागणार आणि आम्ही योग्य तो मानसन्मान आमच्या विभागासाठी मागतो.आमच्या जनतेसाठी मागतो,असे हिंतेंद्र ठाकुर यांनी सांगितले.
दरम्यान हितेंद्र ठाकुरांचे तीन आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसई विधानसभा मतदार संघातून हितेंद्र ठाकूर, नालासोपारामधून क्षितीज ठाकूर आणि बोईसरमधून राजेश पाटील यांनी निवडणुक लढवली आहे. या तीनही जागा बविआने जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वेळेस काय निकाल लागतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
