मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज अमित ठाकरे आणि सदा सरवणकर घऱाबाहेर पडले होते. दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी सिद्धी विनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले होते. या दरम्यानच दोन्ही उमेदवारांची आमने सामने भेट झाली होती.या भेटी दरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत अमित ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या छातीवर उलटा झालेला धनुष्यबाण सरळ केला होता.
advertisement
दरम्यान माहिम मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. माहिममधून मनसेचे अमित ठाकरे रिंगणात आहेत.तर शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना मैदानात उतरवले आहे. आणि ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. यामधून कोणता उमेदवार जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : सदा सरवणकरांच्या जॅकेटवरील उलटा धनुष्यबाण अमित ठाकरेंनी केला सरळ, माहिममध्ये चाललंय काय?
