मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केले आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, जनतेनं शंभर टक्के मतदान केलं पाहिजे. आणि सगळ्यांनीच या मतदानात सहभागी झाले पाहिजे. कुणीही यात काटकसर करू नये. योग्य माणूस निवडण्याची हिच संधी असते.आणि बदल करायचा असेल तर मतदान केलंच पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
advertisement
मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करा आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठा समाजाने दिलेला त्रास विसरू नये. आपल्याला दिलेली खुन्नस विसरु नये,असे जरांगेंनी मराठा समाजाला सांगितले आहे. आणि सरकार कुणाचंही येऊ द्या गुडघ्यावरच टेकविणारच असा इशारा देखील जरांगेंनी दोन्ही आघाड्यांना दिला आहे.माझ्यासोबत कुणी फोटो काढला तर माझा त्याला पाठिंबा आहे असं समजू नका. आणि कुणी संभ्रम निर्माण करेल तर संभ्रम करून घेऊ नका, असे आवाहन देखील जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.
मनोज जरांगेंनी यांनी यावेळी कालिचरण महाराजावर देखील टीका केली. हा शंभर टक्के राजकीय दलाल आहे.हि़ंदू धर्माशी काही देणं घेणं नाही. ओड्यांना जन्मलेली खरकटी पैदास आहे. मराठ्यांचा तिरस्कार करणारा महाराज असूच शकत नाही,अशी बोचरी टीका जरांगेनी केली.
