भाजप नेते चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या पोलवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकदा ईव्हीएम मशीन मध्ये मत बंद झाली की अंदाज व्यक्त करून काही नवीन होणार नसत. पण काही सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने गेले असतील तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपवाद सोडला तर बाकीचे सगळे महायुतीच सरकार येईल असच दाखवत आहे.सरकार वनवे 160 च्या खाली नाही तर ब्रॅण्डेड 160 च्या पुढे असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
तसेच महायुतीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सूरू आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय दिल्लीच करेल.एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे.तेव्हा ते सुद्धा असच म्हणतील निर्णय दिल्लीने करावा.दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही.तसेच सत्ता स्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडणार नाही. कमळ, धनुष्यमान आणि घड्याळ यांच्या 160 ब्रॅण्डेड जागा निवडून येतील. त्याच्यापुढे अपक्ष आहेत,असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या निकालानंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही,असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.