बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती.यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही एक अज्ञात व्यक्ती माधव जाधव यांच्या थेट आंगावर येतो आणि त्यांना धक्काबुक्की करत कानशिलात लगावतो. यानंतर इतर कार्यकर्ते देखील माधव जाधव यांना बेदम चोप देतात. त्यानंतर कार्यकर्ते माधव जाधव यांना मतदार संघातून हाकलून लावातात.
दरम्यान परळी मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होतेय. परळीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.आता या मतदार संघातून कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
