2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत वैभव नाईकांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. या पराभवाची सल नारायण राणे यांना गेल्या 10 वर्षापासून होती.
याच पराभवाचा बदला घेण्यासाठी नारायण राणे यांचे सुपूत्र कुडाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात दोन वेळचे ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांचे आव्हान होते. मात्र या आव्हानाला पेलवत आता निलेश राणे यांनी वैभव नाईकांचा पराभव केला आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयाची कोकणात चर्चा आहे.
advertisement
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
November 23, 2024 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nilesh Rane : बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला, निलेश राणेंनी वैभव नाईकांना अस्मान दाखवलं
