रोहित पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. माझा विजय वडील,आई आणि जनतेला समर्पित करतो,असे रोहित पाटील म्हणाले आहेत. त्याचसोबत या मतदारसंघातल्या जनतेने अडचणीच्या काळात माजी खासदार आणि माजी मंत्री समोर असताना देखील तारण्याचे काम केलं, याबाबत जनतेचे आभार मानले.
या मतदारसंघात पहिलं काम हे गुंडगिरी थांबवण्याचा असेल, आणि असं देखील रोहित पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आबांच्या विचारांचा वारसा रोहित पाटील पुढे घेऊन जाईल आणि तासगावकर व कवठे महांकाळच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे,असं मत रोहित पाटलांच्या बहिण स्मिता पाटील यांनी देखील यावेळी व्यक्त केले आहे.
advertisement
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 23, 2024 7:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आबांच्या लेकाचे विधानसभेत पाऊल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सगळ्यात तरूण आमदार
