सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान उत्स्फुर्तपणे पार पडले आहे. त्यानंतर आता मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची घटना घडली आहे. त्याच झालं असं की सोलापूर दक्षिण मतदार संघातून महाविकास आघाडीतून शिवसेनेने अमर पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती आणि त्यांनी प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन पुकारले होते. यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे ठाकरे काँग्रेसमध्ये जुंपली आहे.
advertisement
खरं तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला होता. या पाठिंब्यानंतर ठाकरे चांगलाच आक्रामक झाला होता त्यांनी जोडे मारो आंदोलन केले होते.
ठाकरे गटाची शिंदेंवर टीका
प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहे. भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी करतात, अशी गंभीर टीका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली होती. त्याचसोबत शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही. शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, असा आरोप कोळी यांनी केला.
लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्या ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार अशा शब्दात कोळी यांनी संताप व्यक्त केला होता.
दरम्यान आता काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर बोलण्याची शरद कोळी यांची लायकी नाहीये. तसेच प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला नाही एवढं लक्षात ठेवा नाहीतर आमचं ते विनिंग सीट होतं. दक्षिण सोलापूरची जागा देऊन काँग्रेसने मोठा त्याग केल्याचे चेतन नरोटेने म्हटले आहे.
त्यामुळे मतदानाचा दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.आता ही बिघाडी कायम राहते की सुटते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
