TRENDING:

निकालाआधीच ठाकरे-काँग्रेस वाद टोकाला? 'या' नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

Last Updated:

निवडणुकीनंतर दोन्ही आघाड्यांनी अपक्ष नेत्यांशी बोलणी सूरू आहे.असे असतानाच निकालाआधीच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतला मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाचा वाद टोकाला पोहोचलाय. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? ते जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडलं आहे. आणि उद्या शनिवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.त्यात निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी खुपच कमी कालावधी मिळणार आहे. या कारणामुळे निवडणुकीनंतर दोन्ही आघाड्यांनी अपक्ष नेत्यांशी बोलणी सूरू आहे.असे असतानाच निकालाआधीच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतला मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाचा वाद टोकाला पोहोचलाय. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? ते जाणून घेऊयात.
ठाकरे-काँग्रेस वाद
ठाकरे-काँग्रेस वाद
advertisement

सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यासह अन्य आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरं तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला होता. या पाठिंब्यानंतर ठाकरे चांगलाच आक्रामक झाला होता त्यांनी जोडे मारो आंदोलन केले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

कोणत्याही परवानगी विना आंदोलन केल्याने शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 223, महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचसोबत शरद कोळी यांना ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली आहे. तसेच दरम्यान शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये साठी खबरदारी म्हणून पोलिसानी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निकालाआधीच ठाकरे-काँग्रेस वाद टोकाला? 'या' नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल