सुप्रिया सुळे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली. अशी कोणताही बैठक झाली याची मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबत आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. हे मी अनेकदा बोलेले आहेत,असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच मी त्या दिवशी झोपले होते. त्यावेळी सदानंद सुळे यांनी मला उठवून टीव्हीवर दाखवलं. मला आणि आमच्या पक्षाला या पहाटेच्या शपथविधीबद्दल आणि मिटींगबद्दल काहीही माहिती नाही. ही मिटींग झाली की नाही? आणि कुठे झाली? या सगळ्याचे उत्तर अजित पवार देऊ शकतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
advertisement
संजय राऊत काय म्हणाले?
उद्योगपतीला सरकार नको होतं. मुंबई महाराष्ट्र त्यांना गिळायचा होता, म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी शिवसेना फोडली. यासाठी त्यांनी उद्योगपतीचा वापर केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारच सांगत आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यासाठी उद्योगपतीचा वापर केला. त्यामुळे अजित पवार हे कबूल करत आहेत यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का? असे राऊत म्हणाले ही मुंबई आणि महाराष्ट्र उद्योगधंदे यांना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला आणि तो यशस्वी झाला म्हणून ही जी आमची लढाई सूरू आहे,असे संजय राऊत यांनी सांगितले.
अजित पवारांचा गौप्यस्फोट काय?
अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. भापज राष्ट्रवादीचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका पार पडल्या होत्या. यातील एक बैठक उद्योगपतीच्या घरी पाडली होती. या एका बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल असे सगळे उपस्थित होते,असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केली आहे. तसेच या बैठकीत उद्योगपती देखील सामील होता.अजित पवार पुढे म्हणाले, त्या गोष्टी आता काढून काही उपयोग नाही. त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची सर्व जबाबदारी मी उचलली आणि सर्व नेत्यांना वाचवलं, असे देखील त्यांनी सांगितलं.
