सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपवर प्रकरणावर भाष्य केले आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोवर मीच पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रक्रियेवर मी सर्वात जास्त प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. त्यामुळे या ऑडिओ क्लिप माझा कोणताही संबंध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही खोटी ऑडिओ क्लिप आहे, मी सायबरला तक्रार केली आहे, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
advertisement
तसेच मी सगळ्यांचा जबाब द्यायला तयार आहे. ते म्हणतील ती जागा ते म्हणतील तो प्लॅटफॉर्म मी बसून उत्तरं द्यायला तयार आहे, असे चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे. मी वकिलांशी बोलले आणि क्रिमिनल डिफरमेशनची नोटीस त्यांना पाठवली आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’
‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’
‘गौरव तू आम्हाला उत्तर का देत नाहीयेस? आम्हाला पहिले पैसे हवे आहेत’, असं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 पुष्टी करत नाही.
