मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काय करणार आणि कसं करणार हे सांगितलं आहे. ब्लू प्रिंटवरून मला हिणवलं गेलं होतं. २००६ मध्ये महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणेन म्हटलं होतं, २०१४ ला आणली पण गेल्या दहा वर्षात त्याबद्दल कुणीच विचारलं नाही. त्याच ब्लू प्रिंटमधले मुद्दे यात असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
advertisement
जाहीरनाम्यात मुलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. याशिवाय दळणवळण, वीज, घनकचरा व्यवस्थापन हे मुद्दे आहेत. राज्यात प्रगतीच्या संधी ज्यामध्ये उद्योग धोरण आणि पर्यटनाचा समावेश आहे. मराठी भाषेला प्राधान्य दिलं जाईल असंही मनसेच्या जाहीरनाम्यात आहे.
आम्ही काय केलं अशी पुस्तिका काढलीय, मनसेला १८-१९ वर्षे झाली यात आम्ही काय केलं, कोणती आंदोलनं केली त्याचा उल्लेख असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
अनेक पक्षांचे जाहीरनामे आले. सगळ्या जाहीरनाम्यात त्याच त्याच गोष्टी आहेत. निवडणुक आयोगाला काहीतरी महत्व असते. आम्ही ५०० प्रति छापल्या आहेत. आजच्या डीजीटल युगात किती छापल्या हे विचारायचे किती हास्यास्पद आहे असंही राज ठाकरे म्हणाले.
