TRENDING:

Maharashtra Election 2024 : उरले 30 तास! महाराष्ट्रात MVA आणि महायुतीची काय स्थिती, किती जागांवर अडलंय घोडं?

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असले तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांचा अजून जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झालेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त ३० तास उरले आहेत. गेल्या पाच वर्षात राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची बनली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी यांचा अजून जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झालेला नाही. अद्याप अनेक जागांवर दोन्ही बाजूने उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. महायुतीने २९ तर महायुतीने ५३ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
News18
News18
advertisement

महायुती आणि महाविकास आघाडी हे आपआपल्या घटक पक्षांसोबत अजूनही चर्चा करत आहेत. काही जागांवर एकमत होत नसल्यानं अनेक जागी उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे. आज दुपारपर्यंत सर्व उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक होत आहे. एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला मतदान असेल. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर ३० ऑक्टोबरला अर्जांची पडताळणी होईल. तर ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

advertisement

Maharashtra Elections 2024 : मनसेच्या इंजिनमध्ये पाठिंब्याचं इंधन कसं भरायचं? महायुतीमध्ये मोठा पेच!

महायुतीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार

सत्ताधारी महायुतीने २३५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने दोन याद्यांमध्ये सर्वाधिक १२१ उमेदवारांची घोषणा केलीय. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महायुतीत अद्याप ५३ जागांवर एकमत झालेलं नाही.

advertisement

मविआत काँग्रेसला सर्वाधिक जागा

मविआमध्ये शिवसेना उबाठा गटाने ८५ उमेदवारांची घोषणा केलीय. यात कोकण आणि मुंबईत मिळून सर्वाधिक ४० उमेदवार आहेत. तर मराठवाड्यात १३ आणि उत्तर महाराष्ट्रात ११ उमेदवार आहेत. विदर्भात ९ आणि पश्चिम महाराष्ट्रात ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.

काँग्रेसने आतापर्यंत ९९ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यात विदर्भात ३४, कोकण आणि मुंबईत १७, पश्चिम महाराष्ट्रात १५, मराठवाड्यात १४, उत्तर महाराष्ट्रात ११ उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७६ उमेदवार जाहीर केले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

महाविकास आघाडीत समाजवादी पार्टीने वेगळी वाट धरली आहे. सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी मविआशी जर लहान पक्षांसोबत चर्चेतून तोडगा निघाला नाही तर २० ते २५ जागांवर उमेदवार उतरवू असं म्हटलं होतं. सपाने पाच उमेदवार जाहीर केले असून सात जागा मागितल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election 2024 : उरले 30 तास! महाराष्ट्रात MVA आणि महायुतीची काय स्थिती, किती जागांवर अडलंय घोडं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल