Maharashtra Elections 2024 : मनसेच्या इंजिनमध्ये पाठिंब्याचं इंधन कसं भरायचं? महायुतीमध्ये मोठा पेच!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत मनसेला काही जागांवर पाठिंबा देण्याचा विचार महायुतीमध्ये सुरू आहे. पण, हा पाठिंबा उघडपणे द्यायचा की पडद्याामागून द्यायचा यावर महायुतीत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला. आता, याच मनसेला विधानसभा निवडणुकीत काही जागांवरून बिनशर्त पाठिंबा देण्यावरून महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला काही जागांवर पाठिंबा देण्याचा विचार महायुतीमध्ये सुरू आहे. पण, हा पाठिंबा उघडपणे द्यायचा की पडद्याामागून द्यायचा यावर महायुतीत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे. माहीम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुनही पेच वाढला आहे.
मनसेने महायुतीला लोकसभेला पाठिंबा दिला होता. त्याच्या परिणामी काही जागांवर महायुतीला फायदा झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना पाठिंबा द्यावा, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे असा प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
महायुतीमध्ये चर्चा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत महायुतीमधील जागा वाटप, मनसेला पाठिंबा आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात काही दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. ही बैठक अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. महायुतीने मनसेला माहिम आणि इतर काही जागांवर पाठिंबा द्यावा असा एक मतप्रवाह महायुतीत सुरू आहे. मात्र, हा पाठिंबा उघडपणे देण्यात यावा की पडद्यामागून देण्यात यावा, यावर खल सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
काही जागांवर महायुती भरणार मनसेच्या इंजिनात पाठिंब्याचे इंधन?
मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मनसेने काही जागांवर आपले लक्ष केंद्रीत केले असून या ठिकाणच्या जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माहीममधून अमित ठाकरे, शिवडी येथून बाळा नांदगावकर, कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि अन्य काही मतदारसंघातून मनसेचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी मनसेला महायुती मदत करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
शिंदे गटाचे उमेदवार त्याग करणार का?
मनसेला पाठिंब्याचा निर्णय घेतल्यास महायुतीमधी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना आपली उमेदवारी घ्यावी लागणार आहे. आधीच चर्चा वाटपात शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे म्हटला जात आहे. त्यामुळे शिंदे गट कितपत त्याग करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : मनसेच्या इंजिनमध्ये पाठिंब्याचं इंधन कसं भरायचं? महायुतीमध्ये मोठा पेच!










