कल्याण ग्रामीण मतदार संघातून राजू पाटील,सुभाष पाटील आणि राजेश मोरे अशी तिरंगी लढत रंगली होती. असं असलं तरी खरी लढत ही मनसे विरूद्ध शिंदेंच्या शिवसेनेत होती. अखेर या निवडणुकीत मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
विशेष म्हणजे माहिम मतदार संघातून राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात होते. त्यांच्याविरूद्द शिंदे सेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत रिंगणात होते. यामधून ठाकरेंचा उमेदवार महेश सावंत विजयी ठरला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 23, 2024 2:42 PM IST
