रोहित पवार म्हणाले, कुठे तरी राज ठाकरेंना वाटले असेल की भाजपच्या नादी लागून आपण उद्ध्वस्त होऊ. भाजपने बिहार, हरियाणामध्ये काही पक्ष उद्ध्वस्त केल्या. महाराष्ट्रात देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन मित्र पक्षांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दिले आणि त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे हे हुशार नेते आहेत. भाजपपेक्षा महाविकासआघाडी बरी... त्यांचे पूर्वीचे देखील संबंध आहेत. अशात भावासोबत जाणे आणि भाजपच्या विरोधात ताकदीने लढणे हे त्यांना उचित वाटत असेल. त्यांनी फक्त संकेत दिले आहेत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
advertisement
राज ठाकरेंची राजकीय उंची भाजपने कमी केली: रोहित पवार
राज ठाकरे यांना भाजपने मत खाण्याची सुपारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारची मतं खाऊन भाजपला मदत करायची असं दिसतंय,लोकांना कळून चुकले आहे. राज ठाकरे यांची राजकारणात जी उंची होती ती भाजपने कमी केली आणि भाजपच सूत्रधार आहे या पक्षाचा , असे देखील रोहित पवार म्हणाले.
भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासावर बोला; रोहित पवारांचा अजितदादांना टोला
मुलासारख्या पुतण्याला तुम्ही सोडलं आणि नातवाकडे लक्ष दिले या अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, शरद पवार कोणतीही निवडणूक लढत नाहीत. ते मार्गदर्शक या भूमिकेत आहेत. पवार साहेबांनी आतापर्यंत मार्गदर्शन केले आणि इथून पुढे देखील ते करतच राहणार आहे. आता कोण काय बोलले? यापेक्षा आपण भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचार, लोक आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलू..
काय म्हणाले होते राज ठाकरे?
ठाकरे बंधू एकत्र न येण्यामागे आतले बाहेरचे लोक असल्याची कबुली राज ठाकरेंनी दिलीये.ले. माझ्याकडून मी सतर्क असतो. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. माझ्या कानावर अनेक गोष्टी येत असतात, काही गोष्टी समजत असतात पण त्या गोष्टी ऐकत नाही असेही राज यांनी स्पष्ट केले.
