बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्यात चांगलाच जोर आहे. जिल्ह्यातील 6 पैकी तीन आमदार बविआचे आहेत. बविआचा प्रभाव वसई, नालासोपरा, विरार सारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. बहुजन विकास आघाडी 'शिट्टी' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असे. आता, हे निवडणूक चिन्ह आता बिहाचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या जनता दल युनायटेडसाठी यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला संताप...
निवडणूक चिन्ह गेल्याने हितेंद्र ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, एवढ्या खालच्या दर्जाचे राजकारण कुणी करु नये, ज्यांना हरण्याची भीती आहे. तेच लोक असा डाव खेळतात, असेही त्यांनी म्हटले. सध्या राजकारण सुरू असून मुद्दाम अशा गोष्टी केल्या जात असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले. चोरीचे, पळवापळवीच्या गोष्टीचा लोकांना विसर पडला होता. आता मात्र, या घटनेने विसरुन गेलेल्या गोष्टी लोकांना पुन्हा स्मरणात येतील, असेही ठाकूर यांनी म्हटले.
हितेंद्र ठाकूर म्हणतात, तरीही आम्हीच जिंकू...
शिट्टी हे निवडणूक चिन्ह गेल्याने बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या अडचणीवर आम्ही मात करून विजय मिळवू असा विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मिळालेले नवीन निवडणूक चिन्ह एका दिवसात लोकांच्या घरात पोहचवतील असेही त्यांनी म्हटले.
