TRENDING:

Maharashtra Elections NCP Ajit Pawar Candidates List : बंडात साथ देणाऱ्यांना संधी, मातब्बर पुन्हा मैदानात, अजितदादांच्या पहिल्या यादीतील ठळक मुद्दे...

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : अजित पवार यांनी आपल्या पहिल्या यादीत अपेक्षे प्रमाणे बंडात साथ देणाऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, त्यातील काही मतदारसंघातील उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांनी आपल्या पहिल्या यादीत अपेक्षे प्रमाणे बंडात साथ देणाऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, त्यातील काही मतदारसंघातील उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेनंतर अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले. जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला जाहीर न करता महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
बंडात साथ देणाऱ्यांना संधी, अजितदादांच्या पहिल्या यादीतील ठळक गोष्टी...
बंडात साथ देणाऱ्यांना संधी, अजितदादांच्या पहिल्या यादीतील ठळक गोष्टी...
advertisement

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यादी जाहीर केली. संसदीय मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली. आज काही जागांवरील उमेदवार घोषित करण्यात येत आहेत असं तटकरे यांनी म्हटले.

अजित दादांच्या पहिल्या यादीतील महत्त्वाच्या गोष्टी...

- अजित पवार यांनी अपवाद वगळता आपल्या जुन्या शिलेदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

advertisement

- बारामती की शिरूर हा प्रश्न निकाली काढत अजित पवार यांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

- अजित पवार यांच्यासह आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, येवलामधून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

- आजच्या यादीत वडगाव शेरी, शिरूर, फलटण आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही.

- पुण्यातील वडगाव शेरी या मतदारसंघातून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांची उमेदवारी वेटिंग लिस्टवर गेली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर सुनील टिंगरे यांच्याबाबतही आरोप करण्यात आले होते.

advertisement

- मुंबईतील अणुशक्ती नगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत. या ठिकाणी त्यांची कन्या सना खान हिला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती.

- तर, नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्दमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

- वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जाते.

advertisement

- महायुतीचा फॉर्म्युला जाहीर न करता उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने कोणत्या पक्षाला किती जागा सुटल्यात, यावर अजूनही सस्पेन्स आहे.

- महायुतीने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने जागा वाटपाबाबत अजूनही वाद असल्याचे दिसून येते.

-  कळवा-मुंब्रा या मतदारसंघातून अजित पवार गटानेे नाजिब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर करत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान निर्माण केले आहे.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केलेले उमेदवार

बारामती - अजित पवार

येवला - छगन भुजबळ

आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील

कागल - हसन मुश्रीफ

परळी - धनंजय मुंडे

दिंडोरी - नरहरी झिरवाळ

अहेरी - धर्मराव बाबा अत्राम

श्रीवर्धन - आदिती तटकरे

अंमळनेर - अनिल भाईदास पाटील

उदगीर - संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

माजलगाव - प्रकाश दादा सोळंके

वाई - मकरंद पाटील

सिन्नर - माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते

अहमदनगर शहर - संग्राम जगताप

इंदापूर - दत्तात्रय भरणे

अहमदपूर - बाबासाहेब पाटील

शहापूर - दौलत दरोडा

पिंपरी - अण्णा बनसोडे

कळवण - नितीन पवार

कोपरगाव - आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळून - शेखर निकम

मावळ - सुनिल शेळके

जुन्नर - अतुल बेनके

मोहेळ - यशवंत विठ्ठल माने

हडपसर - चेतन तुपे

देवळाली - सरोज आहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतपुरी - हिरामण खोसकर

तुमसर - राजू कारेमोरे,

पुसद - इंद्रनील नाईक

अमरावती शहर - सुलभा खोडके

नवापूर - भरत गावित

पाथरी - निर्मला विटेकर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections NCP Ajit Pawar Candidates List : बंडात साथ देणाऱ्यांना संधी, मातब्बर पुन्हा मैदानात, अजितदादांच्या पहिल्या यादीतील ठळक मुद्दे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल