राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या पाचव्या यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. एका जागांवर याआधीच काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे.
पंढरपूरमध्ये मविआचे दोन उमेदवार
पंढरपूरमधून काँग्रेसने माजी आमदार भारत भालके यांचा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता शरद पवार गटानेदेखील अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या जागेवरून कोणी माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
शरद पवारांच्या पाचव्या यादीत कोणाला संधी?
माढा - अभिजीत पाटील
पंढरपूर - अनिल सावंत
मोहोळ - राजू खरे
मुलुंड - संगीता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
उमेश पाटलांना कात्रजचा घाट?
राष्ट्रवादी अजित पवार गटातून मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन शरद पवार पक्षाच्या संपर्कात असलेल्या उमेश पाटील यांना ही मोहोळमधून उमेदवारी देण्यात आली नाही. उमेश पाटील हे मोहोळमधून उत्सुक होते. उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, शरद पवारांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा सुरू आहे.