जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी आव्हाडांनी सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. आता चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यावेळी त्यांना महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नाजिब मुल्ला यांचे आव्हान असणार आहे.
आव्हाडांचा व्हिडीओ चर्चेत...
जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याआधी जितेंद्र आव्हाड यांच्या घरी शास्त्रोक्त पूजा करण्यात आली. यावेळी भटजींच्या मंत्रोच्चारात ही पूजा पार पडली. शरद पवारदेखील यावेळी उपस्थित होते. मंत्रोच्चारात जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या निवडणूक उमेदवारी अर्ज घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. जितेंद्र आव्हाडांच्या या खास देवपूजेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा जवळपास 75 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. यंदा जितेंद्र आव्हाड यांच्या समोरील आव्हान थोडं कठीण असण्याची शक्यता आहे. मुंब्रातील नगरसेवक आणि कधीकाळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू समजले जाणारे नाजिब मुल्ला हे त्यांच्याविरोधात असणार आहेत.
