लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, या निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं याच्या याद्या तयार झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन 4 नोव्हेंबर नंतर आम्ही यादी जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहीर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहीर करू. जरांगेच्या एमडीएमचं काही खरं नाही. उद्याच आरएमडी देखील म्हणतील, असा टोलाही हाके यांनी लगावला. जरांगे हे 4 नोव्हेंबरनंतर एखाद्या रुग्णालयात दाखल होतील आणि सलाईन लावतील असेही त्यांनी म्हटले.
advertisement
या उमेदवारांना आम्ही पाडणारच...
लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, आमची यादी तयार आहे. फक्त जरांगे पाटलांच्या यादीची वाट पाहत आहोत. या निवडणुकीत रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांना आम्ही पाडणारच आहोत असे हाके यांनी सांगितले. घणसावंगीतून राजेश टोपेंच्या विरोधात आमचा अधिकृत उमेदवार असणार असून वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके या आमच्या उमेदवार असतील असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
तरच महायुतीला पाठिंबा...
लक्ष्मण हाके यांनी महायुतीला सशर्त पाठिंबा देणार असल्याचे सूतोवाच केले. त्यांनी म्हटले की, वेळ प्रसंगी आम्ही महायुतीच्या उमेदवारांनाही राजकीय पाठिंबा जाहिर करू पण अट एकच असेल त्यांनी ओबीसी आरक्षण संरक्षणाची हमी द्यावी. त्यासाठी पाहिजे तर आम्हीही स्टँमपेपरवर लिहून मागू असेही हाके यांनी सांगितले.
आनंदराज आंबेडकरांना सवाल...
लक्ष्मण हाके यांनी आनंदराज आंबेडकरांना थेट सवाल केला. त्यांनी म्हटले की, जरांगे यांनी मंडल आयोगाला आम्ही चॅलेंज करत असल्याचे म्हटले. तुम्ही ओबीसींबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. आनंदराज आंबेडकरे एक दिवसआधी त्यांच्या मुलाला आमच्या सभेला पाठवतात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे यांच्यासोबत युती करतात, या दुटप्पी भूमिकेला काय म्हणावं? असा सवालही त्यांनी केला.
