चकवा देत उमेदवारी अर्ज दाखल...
दादर-माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा देत निवडणूक अर्ज दाखल केला. सदा सरवणकर हे मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, मिरवणुकीत सहभागी न होता सदा सरवणकर यांनी थेट आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदा सरवणकर यांनी म्हटले की, माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता आणि अजूनही असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. मला उमेदवारी मागे घेण्यास सांगणाऱ्यांनी काहीतरी थोडा विचार करावा असे सरवणकर यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला घाबरत नसल्याचे सरवणकर यांनी स्पष्ट केले. आपल्यावर कोणाचा दबाव आहे, याचे उत्तर देणे सदा सरवणकर यांनी टाळले.
advertisement
अमित ठाकरेंना शुभेच्छा...
सदा सरवणकर यांना अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, मी निवडणुकीला उभे असलेल्या प्रत्येकाला शुभेच्छा देतो. लोकशाही आहे सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनी निवडणुक लढवावी आणि लोकशाही बळकट करावी, असे सरवणकर यांनी म्हटले.
अर्ज भरण्यास घाई का केली?
सदा सरवणकर यांनी म्हटले की, अर्ज भरण्याची मुदत आज 3 वाजेपर्यंतची होती. त्यामुळे आधीच आपण निवडणूक अर्ज दाखल केला असल्याचे सरवणकरांनी स्पष्ट केले. आपल्या शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला आहे. त्याशिवाय आपण आणखी एक अर्ज भरला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमित ठाकरे, महेश सावंत यांचे आव्हान
दादर-माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना मनसेचे अमित राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी असा सूर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी लावला होता. मात्र, सरवणकरांनी त्यांना सुनावत तुमच्या मतदारसंघातून मनसे उमेदवारासाठी माघार घ्यावी असा सल्ला दिला.
