रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात गणेश लाखन नावाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी एका घरामध्ये संशयास्पदरीत्या पैसे देत असल्याची बाब गावच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनामध्ये आली. यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार केली. शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर साळवी यांनी थेट लांजा पोलीस स्टेशन गाठले. त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
उमेदवार असलेल्या राजन साळवी यांनी चार दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पैशांचा वापर विरोधी पक्षाकडून होत असल्याचं पत्र देखील लिहिले आहे. गणेश लाखन हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. शिवसेना अर्थात महायुतीकडून किरण सामंत हे या ठिकाणी विधानसभेच्या रिंगणात आहेत. मध्यरात्री तीन वाजता हा सारा प्रकार घडलेला आहे.शिवाय मोटार वाहन कायदा 60 / 177 हे कलम देखील आहे भारतीय न्याय संहिता कलम 173, 351 ( 2 ) या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गणेश लखन, बाबू खामकर आणि ओंकार मोरे या तिघांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
