TRENDING:

Maharashtra Elections Amit Shah Rally in Mumbai : मविआला बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपचे 'चाणक्य' अमित शहा आज महाराष्ट्रात

Last Updated:

Amit Shah Rally In Maharashtra : भाजपचे चाणक्य अमित शहा हे मविआच्या बालेकिल्ल्यात सभांचा धडाका लावणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान देणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी उरला असून आता प्रचाराला आणखी धार येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून राज्याच्या प्रचारात सक्रिय होणार आहे. पंतप्रधान मोदी उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा घेणार आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे चाणक्य अमित शहा हे मविआच्या बालेकिल्ल्यात सभांचा धडाका लावणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान देणार आहेत.
मविआला बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपचे 'चाणक्य' अमित शहा आज महाराष्ट्रात
मविआला बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपचे 'चाणक्य' अमित शहा आज महाराष्ट्रात
advertisement

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला सर करण्यास भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्यानंतर 2019 मधील निवडणुकीत भाजपची पकड काही प्रमाणात सैल झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला मतदार पुन्हा आपल्याकडे खेचला. राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रची भूमिका मोठी महत्त्वाची असणार आहे. मविआच्या या बालेकिल्ल्याला हादरा देण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत.

advertisement

मविआच्या बालेकिल्ल्यात शहांची तोफ धडाडणार

इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इचलकरंजीत येणार आहेत. इचलकरंजी विधानसभेचे उमेदवार राहुल आवाडे, शिरोळ विधानसभेचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर व हातकणंगले विधानसभेच्या रिंगणात असलेले अशोकराव माने यांच्या प्रचाराचा प्रारंभ शाह यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर शिराळा, कराड दक्षिण, सांगली या विधानसभा क्षेत्रात प्रचार सभा घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे जवळच्या मतदारसंघातील उमेदवार उपस्थित असणार आहेत.

advertisement

कराड दक्षिणमधून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार आहेत. सांगलीतील शिराळा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत. पण, या मतदारसंघात वाळवा तालुक्याचा भाग येतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रभाव या भागावर आहे. त्यामुळे अमित शहांची या भागातील सभा म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट आव्हान असल्याची चर्चा आहे.

advertisement

अमित शहांचा आजचा प्रचार दौरा कसा?

शिराळा मतदारसंघ

वेळ : सकाळी 11 वाजता

स्थान: विश्वासराव नाईक कॉलेज मैदान, शिराळा, सांगली

कराड दक्षिण विधानसभा

वेळ: दुपारी 12:30 वाजता

स्थान: आदर्श विद्यामंदिर, विंग, कराड, सातारा

सांगली विधानसभा

वेळ: दुपारी 2:15 वाजता

स्थान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, खणभाग, सांगली

इचलकरंजी विधानसभा

वेळ: सायंकाळी 4:15 वाजता

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

स्थान: व्यंकोबा मैदान चौक, कोल्हापूर

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Amit Shah Rally in Mumbai : मविआला बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपचे 'चाणक्य' अमित शहा आज महाराष्ट्रात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल